logo

दिव्यांग, वयोवृद्ध व आजारी मतदारांच्या मदतीसाठी आता स्वयंसेवक !

दिव्यांग, वयोवृद्ध व आजारी मतदारांच्या मदतीसाठी आता स्वयंसेवक !

परतूर प्रतिनिधी :-
भाऊसाहेब पाटील मुके -
लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत दिव्यांग,वयोवृद्ध व आजारी मतदारांना मतदानाचा हक्क बजावताना कुठल्याही प्रकारची अडचण निर्माण होऊ नये यासाठी आता मतदान केंद्रावर स्वयंसेवकांची नियुक्ती करण्यात आली आहे. एनसीसी,एनएनएस तसेच स्काऊट गाईडचे प्रशिक्षण घेतलेले विद्यार्थी स्वयंसेवक म्हणून काम करणार आहेत.
दुसऱ्या टप्प्यातील लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी शुक्रवारी दि.२६ मतदान होणार आहे. प्रशासकीय स्तरावर निवडणुकीची तयारी पुर्ण झाली आहे. जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करावे, मतदानाचा टक्का वाढावा यासाठी निवडणूक यंत्रणा कसोशीने प्रयत्न करीत आहे. दिव्यांग,वयोवृद्ध तसेच आजारी असलेल्या मतदारांना मतदान करताना मतदान केंद्रावर कुठल्याही प्रकारची अडचण निर्माण होऊ नये, त्यांना विनात्रास मतदान करता यावे यासाठी आता १८ वर्षांखालील विद्यार्थ्यांची मदत घेतली जाणार आहे. एनसीसी,एनएसएस, स्काऊट-गाईडचे प्रशिक्षण घेतलेले स्वयंसेवक मतदान केंद्रावर दिव्यांग, वयोवृद्ध तसेच आजारी मतदारांना मदत करणार आहेत.

परभणी लोकसभा निवडणुकीसाठी शुक्रवार दि.२६ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. परतूर विधानसभा मतदारसंघात एकूण ३५० मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. मतदान प्रक्रियेची संपूर्ण तयारी जवळपास पुर्ण झाली आहे. दिव्यांग, वयोवृद्ध तसेच आजारी असलेल्या मतदारांना मतदान करताना मतदान केंद्रावर कुठल्याही प्रकारची अडचण निर्माण होऊ नये यासाठी स्वयंसेवकांची मदत घेण्यात येणार आहे. - मनिषा दांडगे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, परतूर.

शिक्षणाधिकारी कैलास दातखीळ,स्काऊट-गाईडचे जिल्हा समन्वयक के. एल. पवार, परतूर येथील गटशिक्षणाधिकारी संतोष साबळे, मंठा येथील गटशिक्षणाधिकारी अशोक सोळंके, के.जी. राठोड, कल्याण बागल यांच्या मार्गदर्शनाखाली स्वयंसेवक काम करणार आहेत.

6
1077 views